त्वरा करा…MPSC च्या ‘या’ पदांसाठी आजचा शेवटचा दिवस

0
48

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच २३ जानेवारी २०२३ आहे. एकूण ४२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी यांची एकूण 26 पदे भरण्यात येणार आहेत. त्यात शैक्षणिक पात्रता अट म्हणजे पत्रकारिता पदवी, कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा आणि त्यासोबतच ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी यांच्या 14 पदांकरिता शैक्षणिक पात्रता अट पुढीलप्रमाणे असणार आहे. त्यात पत्रकारिता पदवी, कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा आणि ५ वर्षे अनुभव. उपसंचालकाचा 2 पदांकरिता शैक्षणिक पात्रता पत्रकारिता पदवी, कला किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कायद्यातील पदवी आणि पत्रकारितेतील डिप्लोमा आणि या सोबतच ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

 

Spread the love