अभिनेता शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनी पठाण या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली होती. अखेर आज 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला. मात्र प्रदर्शनाच्या काही तास आधीच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. याचा निर्मात्यांना मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
पठाण Filmyzilla आणि Filmy4wap या वेबसाईटवर लीक करण्यात आला आहे. हल्ली सर्रास चित्रपट ऑनलाईन लीक होत असल्याने य़शराजफिल्म्सकडून याबाबत खबरदारी घेण्यात आली होती. मात्र तरीही हा चित्रपट लीक झाला. दरम्यान चित्रपट लिक झाल्यावर यशराज फिल्म्सकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
All set for the biggest action spectacle? A humble request to everyone to refrain from recording any videos, sharing them online and giving out any spoilers. Experience #Pathaan only in cinemas!
Book tickets for #Pathaan now – https://t.co/SD17p6wBSa | https://t.co/cM3IfW7wL7 pic.twitter.com/HmlEKuT6Wj— Yash Raj Films (@yrf) January 24, 2023
”सर्वात मोठ्या अॅक्शन सिनेमासाठी तयार आहात? आमचीसर्वांना नम्र विनंती आहे की चित्रपटाचे व्हिडीओ रेकॉर्ड करू नका. ऑनलाईन शेअर करू नका. चित्रपटाची कथा शेअर करू नका. पठाणचा अनुभव चित्रपटगृहातच घ्या. चला पायरसीविरोधात लढूया”, असे ट्विट य़शराज फिल्मसकडून करण्यात आले आहे.











