बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आता त्याच्या आगामी चित्रपटात भाईजान या नावानेच झळकणार आहे. सलमानचा आगामी चित्रपट किसी का भाई, किसी की जान’ चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा टिझर रिलीज होताच नेटकऱ्यांनी त्यावर उड्या मारल्या आहेत.
या चित्रपटात सलमान सोबत अभिनेत्री पूजा हेगडे, तेलगू अभिनेते वेंकटेश, जगपती बाबू हे देखील झळकणार आहेत. हा चित्रपट 21 एप्रिल 2023 ला ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे.











