सेवाभावे प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त टाकळी येथे भव्य आरोग्य शिबिर

0
49

सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे वर्धापन दिनानिमित्त दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिर टाकळी गावात घेण्यात आले प्रथम आई देव मोगरा व भारत माता यांच्या प्रतिमेला पूजन फुलहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती विमलगिरी हॉस्पिटलचे डॉ.श्री.सारंगी जी माळी सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे,टाकळी गावाचे सरपंच श्री.फित्या दादा ठाकरे हे उपस्थित होते.

यावेळी सेवाभावे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.सागर भाई अरविंद पाटील,रुद्र मेडिकलचे मालक सौरभ भाऊ माळी,ग्रामपंचायत सदस्य संजय वसावे,सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक श्री.अतुल पाटील,श्री.नकुल ठाकरे,टाकळी गावाचे पोलीस पाटील श्री.बटूसिंग वसावे,खर्डीचे श्री.सुनील मदन मोरे,तळवे गावाचे श्री.राहुल साळुंखे,पांढुरके गावाचे श्री.राहुल वसावे हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सूत्रसंचालन सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक श्री.नकुल दित्या ठाकरे यांनी केले.

कार्यक्रमाला प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केली ते म्हणालेत की, प्रतिष्ठानाच्या वर्धापन दिन म्हणजे आनंद उत्सव असतो या आनंदाच्या प्रसंगी आपण समाजाच्या हितासाठी काहीच नाही काही उपक्रम घेण्यात येत असतात प्रतिष्ठानने गेल्या चार वर्षांमध्ये समाज उपयोगी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले आहेत यावर्षी देखील वर्धापन दिन तळोदा तालुक्यातील अतिदुर्ग भागात टाकळी गावात आज शिबिर घेण्यात येत आहे व मोठ्या प्रमाणात या शिबिराला लोकांच्या प्रतिसाद आहे.

यावेळी विमलगिरी हॉस्पिटलचे डॉ.श्री.सारंगी जी माळी हे म्हणालेत कि, प्रतिष्ठानाचे कार्य मी गेल्या चार वर्षापासून पहात आहे ते या वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम कार्यक्रम घेत असतात यावर्षी त्यांनी घेण्यात आलेला हा आरोग्य शिबिर या घटकांना आवश्यक असतो तिथे घेत आहेत ज्या गावाला आम्ही आलो तेथे येण्यासाठी पक्का रस्ता देखील नाही परंतु प्रतिष्ठान व त्याचे कार्यकर्ते जिथे कमी तिथे आम्ही या पद्धतीने कार्य करत आहेत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

सेवाभावे प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेले आरोग्य शिबिराचे नियोजन प्रतिष्ठानचे सचिव श्रीमती कविता दिलीप कलाल, संचालक श्री नकुल दित्या ठाकरे, संचालक श्री.अतुल भिमसिंग पाटील, कार्याध्यक्ष श्री.संतोष जगत चौधरी, श्री.अनिल भाऊ नाईक, चि.पवन विजय सोनवणे, श्री.चंभुलाल ठाकरे, चि.रोहन गुरव,श्री.धरमसिंग ठाकरे,श्री.रोडत्या वसावे यांनी शिबिरासाठी मेहनत घेतली.

Spread the love