प्रतिनिधी – राजेंद्र महाले
रावेर – तालुक्यातील निंभोरा बु.येथील रहिवाशी दगडु उर्फ अजय ज्ञानेश्वर राजपूत वय(२६) या युवकास मध्य रेल्वेच्या निंभोरा ते रावेर डाऊन लाईन वरील रेल्वे खांब क्र.४६९/१२ ते १४ दरम्यान काल संध्याकाळी ५:४२वा.मि च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत जबर मार लागून जागीच मृत्यू झाला असून मयताचे वडील ज्ञानेश्वर भावसिंग राजपूत यांनी प्रेताची ओळख पटविली असता पंचांसमक्ष पंचनामा करून निंभोरा पोलीस स्टे.ला गुरनं २/२०२३ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत निंभोरा पोलीस स्टे.चे सपोनी गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.हेका ज्ञानेश्वर चौधरी,पो.ना ईश्वर चव्हाण हे करीत आहे.











