राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या एका नेत्याने चिथावणीखोर विधान केलं आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात टीका होताना दिसत आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर जालन्यात जितेंद्र आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्याला 10 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केली











