मोनिका सुरेंद्र भावसार यांचा साप्ताहिक कृषीसेवक राज्यस्तरीय पुरस्कारने सन्मानीत

0
44

 प्रतिनिधी – राजेंद्र महाले

रावेर – जि.जळगाव याठिकाणी दिनांक ०५ फेब्रुवारी २०२३ रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कु. मोनिका सुरेंद्र भावसार रा. साकेगाव, भुसावळ यांना राज्यस्तरीय कृषीसेवक आदर्श कृषीतज्ञ या पुरस्काराने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्यांनी शेतकरी बांधवासाठी उपयुक्त असे कृषी साहित्य विविध वृत्तपत्रातुन प्रकाशित केलेले आहेत. त्या डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या, सध्या त्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे मृदा विज्ञान आणि कृषी रसायन शास्त्र या विषयात पी. एच. डी. करीत आहेत.

याकार्यक्रमास रावेर-यावल विधानसभा आमदार शिरिषदादा चौधरी,माजी खासदार डॉ. उल्हास पाटील,माजी आमदार अरुणदादा पाटील, साप्ताहिक कृषीसेवक चे संपादक कृष्णा पाटील, तहसीलदार उषाराणी देवगुणे, उद्योजक श्रीराम पाटील,माफदाचे राज्याध्यक्ष विनोद तराळ,कामगार नेते दिलीप कांबळे, राष्ट्रवादीचे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपानदादा पाटील,डॉ. श्रीराम पाटील, योगीराज पाटील,तालुका कृषी अधिकारी मयुर भामरे, सुनील कोंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कु. मोनिका सुरेंद्र भावसार यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन करण्यात येत आहे.

Spread the love