डांगरी येथील मुक्ताई दिंडीचे कांचन नगरात कार्यक्रम

0
48

जळगाव-: येथील कांचन नगरात जागृत गुरुदत्त मंदिरात प्रगणे डोंगरी ते मुक्ताई मेहुन येथे जाणाऱ्या पायी दिंडीचा मुक्काम काल होतो.

सदरहू दिंडीचा सुरुवाता प्रगणे डोंगरी ता. अमळनेर येथून दिनांक ०७/०२/२०२३ रोजी झाली हि दिंडी काल दिनांक १३/०२/२०२३ रोजी कांचन नगरात जागृत गुरुदन मंदिर येथे आगमन व मुक्काम झाला. या परिसरात रांगोळ्या व फुलांनी फटाके फोडून ठिकठिकाणी चहा- पाणी अल्पहार करीत परिसरातून दिंडीची भव्य स्वागत करण्यात आले दिंडीचे दत्त मंदिरान रात्री हरिपाठ, भजन, मुक्काम व सकाळी काकडा सदर केला. या दिंडीचे नऊ मुक्काम होत असून हि दिंडी १६/०२/२०२३ रोजी मुक्ताई मेहूण येथे पोहोचेल या दिंडीत ७५ वारकरी सहभागी आहेत.

या दिंडीचे चालक मालक ह.भ.प. विशाल महाराज ह.भ.प. प्रतिभा ताई महाराज, ह.भ.प. गणपत महाराज हे आहेत दिंडीचे विणेकरी उत्तम महाराज, विपुल महाराज हे आहेत.

कांचन नगरात सदरहू दिंडीची व्यवस्था दत्त मंदिर विश्वस्त राजेंद्र कोळी, ज्ञानेश्वर कोळी, गणेश धनगर, उमेश सोनवणे, दिलीप सपकाळे, गोपीचंद साळुंखे, भगवान नन्नवरे, नामदेव सपकाळे, मुकेश सोनवणे, भूपेंद्र शर्मा, शाम शिंपी, इंदुबाई मराठे सुंदरबाई सोनवणे यांनी पाहिले.

Spread the love