ठाकरे गटाला मोठा धक्का…धनुष्य बाण आणि पक्षाचे नाव शिंदे गटाच्या पारड्यात !

0
43

शिवसेनेतील बंडाळीनंतर गेले अनेक दिवस चाललेल्या वादाचा एक महत्वपुर्ण निकाल आज निवडणुक आयोगाने दिला आहे. शिवनसेनेचे चिन्ह धनुष्य बाण आणि पक्षाचे शिवसेना हे नाव शिंदे गटाच्या पारड्यात टाकले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक मोठी आणि ऐतिहासिक घटना मानली जात असून हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडोमोढी घडण्याच्या शक्यता आहेत.

Spread the love