दिवाळी उत्सवा निमीत्ताने महात्मा गांधी पुतळ्याची उर्वेश साळुंखे यांनी केली साफसफाई

0
47

बुधगाव येथील रहिवासी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी चोपडा येशील महात्मा गांधी पुतळ्याची दिवाळी निमित्ताने साफसफाई केली. देशात व राज्यात दिवाळी हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सणांचा राजा दिवाळी असं सुध्दा म्हटलं जातं. प्रत्येक घरात, ऑफिस, दुकानें दिवाळी आधी साफसफाई केली जाते. व प्रत्येकाच्या घरांवर, दुकानं, ऑफिस लाईट, लाईटिग इत्यादी नवनवीन वस्तूंनी सजावट दिवाळी निमित्त केली. ज्या महा- पुरूषांमुळे आपल्यात असे दिवाळी सारखें मोठ-मोठे सण आनंदाने साजरा करता येतात… आणि त्याच महापुरुषांच्या पुतळ्या जवळ असे धुळीचे साम्राज्य राहिला नको व अस्वच्छता राहायला नको ! अशा संपूर्ण गोष्टी लक्षात घेता दि.२३ रोजी दुपारी १२:३० मि. दरम्यान उर्वेश साळुंखे यांनी साफसफाई केली.

Spread the love