अभिनेता शाहरूख खानआणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी चित्रपटातील पहिले गाणे ‘बेशरम रंग’ रिलीज करण्यात आले. तेव्हापासून या गाण्यातील बोल आणि दीपिकाचे कपडे यावरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ उडाला आहे.
‘बेशरम रंग’ या गाण्यामध्ये दीपिका पदुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. त्यामुळे वादाला सुरुवात झाली आणि सोशल मीडियावर चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. या वादात आता राजकीय नेत्यांनी उडी घेतली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तमदास मिश्रा यांनी तर या चित्रपटावर राज्यात बंदी घालण्यात येईल, अशी धमकीही दिली आहे.
‘पठाण’ या चित्रपटात अनेक चुका असून हा चित्रपट विखारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्याचे बोल आणि दीपिका पदुकोण हिने घातलेली भगव्या रंगाची बिकीनी बदलण्याची गरज आहे, अन्यथा मध्य प्रदेशमध्ये आम्ही या चित्रपटाचा एकही शो लागू देणार नाही, अशी धमकी नरोत्तमदास मिश्रा यांनी दिली आहे.
The film 'Pathaan' is full of faults & based on toxic mentality. Lyrics of song 'Besharam Rang' & saffron&green clothes worn in the song need to be corrected or else we will take decision on whether to let the film's screening happen in MP or not: MP Home Minister Narottam Mishra pic.twitter.com/csEl6jUd4t
— ANI (@ANI) December 14, 2022
दुसरीकडे स्वामी चक्रपाणी महाराज यांनीही सोशल मीडियाद्वारे या चित्रपटावर टीकेची झोड उठवली आहे. शाहरूख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने भगवा आणि हिंदू संस्कृतीचा अपमान केला आहे. सेन्सर बोर्ड झोपा काढतंय का? या चित्रपटावर बंदी घाला. अन्यथा हिंदू महासभा याचा विरोध करेल, असे ट्विट अखिर भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी केले आहे.
शाहरुख खान की फिल्म पठान में भगवा और हिंदू संस्कृत का अपमान, आखिर फिल्म सेंसर बोर्ड क्यों सो रहा है, लगाए प्रतिबंध, हिंदू महासभा इसका करेगा विरोध🌸🙏🌸 स्वामी चक्रपाणि महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष ,अखिल भारत हिंदू महासभा pic.twitter.com/bD2cNVQLHk
— Swami Chakrapani Maharaj (@SwamyChakrapani) December 14, 2022











