प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरे – वांजोळे रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात मोटरसायकल घसरून एक इसम जखमी झाल्याची घटना घडली.
या बाबत माहिती अशी की दि.२८ जुलै रोजी गोविंदा सोपान पाटील रा.वांजोळे ता भुसावळ ( वय ४४ ) हे आपल्या फोर एक्स मोटरसायकल वर स्वार होऊन गोजोरे येथून पिकांसाठी फवारणी चे औषध घेऊन जात असताना गोजोरे – वांजोळे गावा दरम्यान किशोर सावळे यांच्या शेता जवळ रस्ता निकृष्ट दर्जाचा असल्याने मोटरसायकल घसरून जखमी झाले. यावेळी घटना घडली त्या ठिकाणी असलेले पत्रकार किशोर सावळे घटनास्थळी धाव घेऊन जखमी गोविंदा सोपान पाटील यांना विघ्नहर्ता हाॅस्पीटल भुसावळ येथे दाखल केले. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटना घडली त्यावेळी शेतात काम करणारे नबाबाई बाविस्कर व पत्रकार किशोर सावळे यांनी पोलीसांना विचारलेली माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून वांजोळा ते गोजोरा या रस्त्यावर खड्डे पडले आहेत संबंधित ठेकेदाराला सांगूनही उपयोग होत नाही जखमी गोविंदा पाटील यांचा खड्डे चुकविण्यासाठी प्रयत्नात असताना अपघात घडला असावा असे वांजोळे येथील किशोर सावळे यांनी सांगितले आहे.
गोजोरा वांजोळे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.












