जगदंबा तलवार हिंदुस्थानात आणणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

0
43

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्तस्पर्शाने पुनित झालेली आणि प्रत्येक शिवभक्तांची अस्मिता असणारी इंग्लंडमधील जगदंबा तलवार पुन्हा हिंदुस्थानात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग केंद्र सरकारच्या माध्यमातून तसा प्रयत्न करत असून. इंग्लंडचे नवनिर्वाचित हिंदुस्थानी वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशीही याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

मुनगंटीवार म्हणाले, जगदंबा तलवार ब्रिटिश मोहापोटी घेऊन गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयादशमीच्या पूजेतील ही जगदंबा तलवार असून ती हिंदुस्थानात परत आणण्यासाठी केंद्राकडे आम्ही पत्रव्यवहार सुरू केला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशीही चर्चा करण्यात येणार आहे.

Spread the love