ना.आदिती तटकरे यांना लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे निवेदन !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – महिला व बालविकास मंत्री ना.कु. आदितीताई तटकरे यांची भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विलास पाटील यांनी भेट घेऊन भुसावळ तालुक्यातील अनेक महिला अजूनही लाडकी बहिण योजनेपासून वंचित आहेत तसेच केवायसी पोर्टल बंद असल्याने अडचणी येत आहेत त्यामुळे लवकरात लवकर गरजू महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळावे म्हणून लेखी निवेदन देऊन वरील मागणी केली.

याबाबत सविस्तर असे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे ह्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भुसावळ तालुका अध्यक्ष विलास पाटील यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भुसावळ तालुक्यातील बहुतांशी महिलांची केवायसी झालेली नसून अथवा काही आदिवासी महिला व अशिक्षित महिला या केवायसी न झाल्यामुळे मिळणाऱ्या लाभापासून वंचित झालेले आहेत या अगोदर केवायसी चे पोर्टल द्वारे फक्त दुरुस्तीचे काम केले गेले. मात्र केवायसी पासून वंचित राहिलेल्या महिला आज देखील लाभापासून दुरावल्या गेल्या आहेत. कारण काही महिलांनी केवायसी केलेलीच नाही. तरी अशा महिलांसाठी पुन्हा एकदा ठराविक कालावधीची मुभा देण्यात येऊन केवायसी पासून वंचित झालेल्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करून घ्यावे अशा आशयाचं निवेदन विलास पाटील यांनी मंत्री आदिती तटकरे यांना दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) उमेश नेमाडे, युवक तालुका अध्यक्ष श्री अतुल चव्हाण, सामाजिक न्याय जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे , विरेंद्र (लल्ला) मोरे, समाधान पाटील ,भास्कर पाटील , दिनेश पाटील , डोंगरदास जावळे, मयूर भोळे, काके व महिला उपस्थित होते.

Spread the love