निंभोरा येथील ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांना उत्कृष्ट संगीत कलारत्न पुरस्काराने सन्मानित

0
52

प्रतिनिधी – राजेंद्र महाले

रावेर – तालुक्यातील निंभोरा येथील कलावंत व जेष्ठ पत्रकार श्री राजीव तुकाराम बोरसे हे गेल्या तीस वर्षापासून पत्रकारीता बरोबरच रॉयल कला ग्रुप च्या माध्यमातून तसेच ऑर्केस्ट्रा द्वारे त्यांनी सिने कलावंत व स्थानिक कलावंत सोबत घेऊन मंदिर इमारत उभारणी , शैक्षणिक संस्था इमारत उभारणी साठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून लोकसहभागा तुन विविध कार्यक्रम सादर केले होते . तसेच युवक युवतींना कलेचे व्यासपीठ मिळावे म्हणून जिल्हस्तरीय व राज्य स्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले असल्याने याची नोंद खिर्डी येथील तत्पर फाउंडेशन यांनी घेऊन त्यांना एक श्याम देश के नाम या सांस्कृतिक कार्यक्रमात आमदार चंद्रकांत भाऊ पाटील, उद्योजक श्रीराम पाटील ,माजी अध्यक्ष जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन ,भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत महाजन, परमपूज्य आचार्य मानेकर बाबा शास्त्री, परमपूज्य स्वरूपानंद जी महाराज, परमपूज्य आचार्य महंत नरेंद्र महाजन या मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट संगीत कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . बोरसे यांना याआधी देखील सन 2004 साली सामाजिक एकता पुरस्कार त्या वेळचे मंत्री व आमदार एकनाथराव खडसे, विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,उद्योगपती अशोक जैन यांच्या हस्ते जळगाव येथे मिळाला होता तसेच बोरसे यांनी शांतता व जातीय सलोखा राखण्यासाठी विशेष सहभाग दिसून आल्याने 2017 ला पोलीस प्रशासनातर्फे निंभोरा पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर जालिंदर सुपे ,फैजपूर येथील प्रांताधिकारी ,फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी, रावेर तहसीलदार व निंभोरा पोलीस ठाण्याचे त्या वेळेचे सपोनी गणेश कदम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता . त्याचबरोबर खिर्डी बुद्रुक येथे 2003 ला ग्रामपंचायत तर्फे त्या वेळ चे आमदार राजाराम महाजन,जि प अध्यक्ष अशोक भाऊ कांडेलकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव झाला होता .नुकताच आता बोरसे यांना तत्पर फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट संगीत कलारत्न पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे

Spread the love