लोकप्रिय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे निंभोरा स्टेशन (र उड्डाणपुल (FoB) स्थळी; भेट देऊन केली पाहणी

0
42

रावेर – मौजे निंभोरा स्टेशन (रावेर) येथे रेल्वे स्टेशन जवळ दोन्ही बाजूने निंभोरा व खिर्डी गावाचा मुख्य वाहतुकीचा रस्ता असल्याने रेल्वे विभागामार्फत सदर ठिकाणी उड्डाणपूल (FoB) प्रस्तावित करण्यात आलेला असुन, सध्या उड्डाणपूलाचे (FoB) काम प्रगतिपथावर आहे. आज सदर ठिकाणी भेट देऊन उड्डाणपूल (FoB) ची पाहणी केली. तसेच रेल्वे अधिकाऱ्याकडून कामाच्या प्रगतीबाबत यावेळी माहिती घेऊन, योग्यत्या सुचना रावेर लोकसभा लोकप्रिय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केल्या.

यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.महेश चौधरी, जनकल्याण चे श्री. हरलाल कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस श्री. शुभम पाटील, श्री. दुर्गेश पाटील, माजी प.स.सदस्य श्री. प्रमोद रोझतकर, निंभोरा भाजपा शहराध्यक्ष श्री. राजेंद्र महाले, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख श्री. रवींद्र महाले, श्री. विजय सोनार, ज्येष्ठ पत्रकार श्री.राजीव दादा बोरसे, भाजपा जिल्हा ग्रामीण सरचिटणीस श्री. मनोज भाऊ सोनार श्री. पप्पू कोळंबे, निंभोरा सरपंच श्री. सचिन महाले, पत्रकार श्री. आशिष बोरसे ई. उपस्थित होते.

Spread the love