दुबईत ज्या बिर्याणीवर ताव मारुन लोकांनी ती खाल्ली खरी, मात्र नंतर त्या बिर्याणीत एका तरुणाच्या मासाचे बारीक बारीक तुकडे असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.
नवी दिल्ली : बिर्याणी (Biryani) म्हटलं की तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र तुम्ही जी टेस्टी (Testi) बिर्याणी खाता आहात त्यात मानवी मास म्हणजेच ह्युमन फ्लेश आहे, असे तुम्हाला कुणी सांगितले तर ?, तर तुम्हाला कसं वाटेल, तुम्ही ती बिर्याणी त्याक्षणी ओकाल की नाही ? काही क्षण या अनुभवाचा विचार केला तरी तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मात्र काही जणांनी प्रत्यक्षात अनुभव घेतलाय. दुबईत ज्या बिर्याणीवर ताव मारुन लोकांनी ती खाल्ली खरी, मात्र नंतर त्या बिर्याणीत एका तरुणाच्या मासाचे बारीक बारीक तुकडे असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये.
मृतदेहाची बिर्याणी करणारी गर्लफ्रेंड
30 वर्षांची एक तरुणी एका तरुणासोबत गेल्या 7 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. या दोघांमध्ये सुरुवातीला चांगलंच प्रेम होतं. नंतर काही वर्षांनी या तरुणानं या तरुणीपासून अंतर राखायला सुरुवात केली. या तरुणीनं हा असं का वागतोय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा तिला धक्काच बसला. या तरुणाचं दुबईतच दुसऱ्या एका तरुणीशी अफेयर असल्याचं तिला समजलं. याबाबत तीनं रागात आपल्या बॉयफ्रेंडकडं विचारणा केली. त्यानंतर या दोघांमध्ये यावरुन भांडण झालं. आणि तिचा बॉयफ्रेंड वेगळा राहायला लागला. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पुढं जे घडलं ते जास्त हादरवून टाकणारं होतं.
घरात बोलवून बॉयफ्रेंडची केली हत्या
आपल्या बॉयफ्रेडनं आपल्याला धोका दिला, ही भावना तिच्या मनात कायम होती. ती रागानं धुसफुसतही होती. काही दिवसांनी तिनं तिच्या बॉयफ्रेंडला घरी जेवण्यासाठी निमंत्रित केलं. ती त्यावेळी एकटीच राहत होती. बोलता बोलता पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. त्यावेळी रागाच्या भरात या तरुणीनं चाकूनं बॉयफ्रेंडचा खून केला. आता त्या अपार्ट्मेंटमध्ये तरुणी त्या मृतदेहासोबत एकटीच होती. घरात रक्ताचे पाट वाहत होते. रात्रभर तरुणी त्या मृतदेहासोबत तशीच बसून होती. दुसऱ्या दिवसाची सकाळ कधी झाली हे तिला कळलंही नाही. तेवढ्यात तिच्या बॉयफ्रेंडच्या मोबाईलवर तिच्याच एका मैत्रिणीचा फोन आला. या तरुणीनं तो उचलला. ती मैत्रिण त्यांच्या घरी इतर मित्रांसह येणार असल्याचं तिनं त्या फोनवर सांगितलं. आता काय करायचं असा प्रश्न तिला पडला. तिनं त्या मैत्रिणीला समजावायचा खूप प्रयत्न केला, मात्र त्या मैत्रिणीनं तिचं ऐकलं नाही.
बाजारातून आणली मोठी भांडी
त्या मैत्रिणीच्या फोननंतर ही तरुणी वास्तवात आली. तिनं तातडीनं घर साफ केलं. रक्ताचे डाग पुसून टाकले. मृतदेह स्टोअर रुममध्ये ठेवून दिला. त्यानंतर तिची मैत्रीण आली. तिनं तिच्यासोबत कॉफी प्यायली. तिची मैत्रीण गेल्यानंतर या आरोपी तरुणीनं बाहेर जाऊन मोठी भांडी, मोठा चाकू, मीट ग्रायंडर खरेदी केलं.
हाडांची केली पावडर
परतल्यानर तिनं त्या मोठ्या चाकूनं मृतदेहाचे बारीक बारीक तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे मोठ्या भांड्यात ठेवून तिनं ते गॅसवर शिजवले. अनेक तासांनी जेव्हा मास शिजलं आणि हाडवं वेगळी झाली, तेव्हा तिनं ती हाडं एका वेगळ्या भांड्यात काढली. बॉयफ्रेंडचं मास तिनं भातासोबत शिजवंलत त्यात बिर्याणी मसाले वगैरे घातले. त्यामुळं त्याची टेस्ट वाढली.
4 दिवस मानवी मासाची केली बिर्याणी
या सगळ्या काळात तिनं हाडं ओव्हनमध्ये गरम केली. त्यानंतर त्याचं पीठ मिक्सरवर बारीक केलं. ही पावडर तीनं बेसिनमध्ये पाणी टाकून फेकून दिली. पुरावे राहू नयेत, यासाठी तिनं हा सगळा खटाटोप केला. त्यानंतर तिनं तयार केलेली बिर्याणी ती जवळच सुरु असलेल्या बांधकाम मजुरांना देऊन ती घरी परतली. खुनाचे सगळे पुरावे तिनं जवळपास नष्ट केले होते. या तरुणाचा मोबाईल आणि इतर डॉक्युमेंटस तिनं घरातच जाळून टाकले. हा तरुण जेव्हा घरी परतला नाही तेव्हा तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत केली. या तरुणीशी त्याचे संबंध असल्यानं पोलिसांनी चौकौशीही केली मात्र तरुणीनं तो कुठं आहे हे माहीत नसल्याचं सांगितलं.
एका दातामुळं समोर आलं रहस्य
पोलसांनी शेजारी चौकशी केली तर तिच्या घरातून गेले काही दुर्गंधी येत असल्याचं शेजारच्यांनी साांगितलं. मात्र त्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे नव्हते. या तरुणीच्या घरात तापस केल्यावरही पोलिसांना काही मिळालं नाही. पोलिसांनी भांडी आणि ब्लेंडर तपासले तेव्हा त्यात एक दात अडकून पडला होता. तो तिच्या लक्षात आला नव्हता. त्यावरुन या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला.
हे प्रकरण 2018 सालातील आहे. ही तरुणी मोरोक्कोतील रहिवासी होती आणि काही वर्ष दुबईत राहत होती. यानंतर त्या तरुणीला अटक करण्यात आली. त्यानंतर तिनं चौकशीत हा सगळा घटनाक्रम सांगितला. बॉयफ्रेंडची थेट बिर्याणी करणाऱ्या या गर्लफ्रेंडनं राक्षसीपणाची सगळी हद्दच पार केली होती.











