सुनसगाव विद्यालयात ‘ एक पेड माॅं के नाम ‘ निमित्त वृक्षारोपण !

0
4

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय येथे

राष्ट्रीय हरित सेना योजना या योजने अंतर्गत दि.२३ जुलै रोजी एक पेड माँ के नाम’ (एक झाड आईच्या नावाने) हा पर्यावरण संवर्धन आणि मातृत्त्वाचा सन्मान करणारा एक राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात आला.ज्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केली. या मोहिमेअंतर्गत शाळेतील इको क्लबच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रोप देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किंवा तिच्या आठवणी निमित्त किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करू अशी शपथ घेतली.

पर्यावरण संवर्धन: हवामानातील बदल आणि घटत्या हरित पट्ट्याला रोखण्यासाठी वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणे. मातृत्त्वाचा गौरव: जन्मदात्री आई आणि निसर्ग माता (पृथ्वी) या दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य असल्याचे

कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक जे.पी. सपकाळे यांनी सांगितले.जेष्ठ शिक्षक श्री के डी तायडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Spread the love