उद्या मतमोजणी,दूध संघाच्या १९ जागांसाठी १०० टक्के मतदान

0
41

जळगाव-:आज शनिवार दि. १० डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा दूध संघाच्या मतदानात १०० टक्के मतदान झाले आहे. उद्या मतमोजणी होणार असून, सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दिली आहे.

आज शनिवार दि. १० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात ४४१ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया निर्विवाद व शांततापूर्ण वातावरणात पार पडली. दुपारी १२ ते २ या कालावधीपर्यंत जवळपास ९५.२३ टक्के मतदान पूर्ण झाले होते. सकाळी ८ ते १० वाजे दरम्यान केवळ १८ टक्के मतदान झाले होते. १९ जागांसाठी १०० टक्के मतदान झाल्याने सहकार व शेतकरी विकास पॅनलमध्ये विजयासाठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे. यातच दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विजयाची दावेदारी केली आहे.

Spread the love