सातपुडाच्या पायथ्याशी असलेले सत्रासेन परिसरातून गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्याना अटक…

0
13

हेमकांत गायकवाड

लासूर ता. चोपडा : सत्रासेन गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खामखेडा तीन रस्त्यावर गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी पोलिस हवालदार लक्ष्मण शिंगाणे, पोलिस नाईक रितेश चौधरी यांनासोबत घेऊन मध्य प्रदेशातील पारची उमर्टी येथून मोटारसायकलवर गावठी कट्टा घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

तीन युवक गावठी कट्टा घेवून येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पारची उमर्टी कडून येणारी मोटारसायकल क्रमांक एम.एच.१९ डी. क्यू ५७७६ वरील निलेश सोनवणे (वय २१) यांच्या जवळ पंचवीस हजार रुपये किम्मतीचा एक गावठी कट्टा सह एक मॅगझिन आढळून आला. तर, दुसरा आरोपी आप्पा कोळी (वय २०) याच्याकडे चार हजार रुपये किम्मतीचे चार जिवंत काडतुसे सापडले असून तिसरा आरोपी आकाश सोनवणे (वय २०) जवळील पंचवीस हा रुपये किम्मतीचे एक गावठी पिस्तूल रिकामी मॅगझिन आ आले. तिघांना ताब्यात घेण्यात आल असून त्यांच्याकडील मोटारसायकल अंदाजित किंमत तीस हजार रुपये व विस हजार रूपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपी हे हे सर्व आरोपी पाचोरा येथील रहिवासी आहेत. त्या आरोपी विरूद्ध पोलिस नाईक रितेश चौधरी यांनी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाणे करत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गावठी कट्टा तस्करीच्या घटना थांबविण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असून त्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह त्यांचे सहकारी प्रयत्न करीत आहे.

Spread the love