अकुलखेडा येथे पत्याच्या क्लबवर धाड… चोपडा शहर पोलीसाची धडाकेबाज कारवाई…. 

0
12

हेमकांत गायकवाड

चोपडा( प्रतिनिधी : तालुक्यातील अकुलखेडा येथे प्लॉट एरिया भागात पाण्याच्या टाकी जवळ इलेक्ट्रिक पोलच्या खाली मच्छिंद्र उत्तम बाविस्कर (४०), महेंद्र विनायक कढरे (४०) । अनंत साहेबराव धनगर (४०), उमेश राजेंद्र कोळी (३१), योगेश युवराज , कुंभार (३२), भूषण रमेश पाटील (२४) समाधान भीमराव बैसाणे (३०) । महेंद्र चिंधा बनसोडे (३४), कैलास हिलाल पाटील (३६),शरद काशिनाथ महाजन (३५) ,चेतन दिलीप पाटील (२४) सर्व राहणार अकुलखेडा हे स्वतःच्या फायद्यासाठी बावन्न पत्त्यांच्या कॅटवर झन्ना मन्ना पत्ता जुगाराच्या खेळ खेळत व खेळवीत असताना शहर पोलिसांनी धाड टाकली असता, सदर धाडीत २४२९० रुपये रोख व २९००० रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण ५३२९० रुपयांच्या ऐवज हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे .

३६३/२०२१ महाराष्ट्र जुगार अँक्ट कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. मधुकर पवार हे करीत आहेत.

Spread the love