प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – संविधान नगर परिसरातील लोणारी हाॅल जवळ एका घराच्या दरवाजाचा कडी कोंडा लोखंडी सब्बल घ्या सहाय्याने तोडून घरातील टी व्ही गॅस शेगडी व स्टील ची भांडी असा एकूण आठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना २१ जुलै रोजी रात्री घडली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ ,३३१ (४) ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत मयुर संदीप लोखंडे ( वय १८ , व्यवसाय मजूरी , रा.लोणारी हाॅल जवळ संविधान नगर भुसावळ ) यांनी फिर्याद दिली. त्या नुसार बाबू सिकंदर शेख रा.कवाडे नगर भुसावळ , आणि संदीप देवराम कहार रा.नार्थ काॅलनी भुसावळ यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेली माहिती नुसार २१ जुलै रोजी रात्री सुमारे १ वाजता आरोपींनी फिर्यादी च्या संमती शिवाय सब्बल च्या सहाय्याने घराचा कडी कोंडा तोडून घरात अनधिकृत प्रवेश केला त्यानंतर घरातील तीन हजार रुपये किमतीचा १८ इंची एलजी कंपनीचा टीव्ही, २ हजार ५०० रुपये किमतीचा भारत गॅस सिलिंडर , १ हजार रुपये किंमतीची गॅस शेगडी , आणि १५०० रुपये किंमतीची संसार उपयोगी स्टील भांडी असा एकूण आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रज्जाक खान पुढील तपास करीत आहेत.












