नांद्रा खु ग्रा.पंचायत पोटनिवडणुकीत मनिषा पाटील यांची बिनविरोध निवड.

0
45

जळगाव – तालुक्यातील नांद्रा खु ग्रामपंचायत पोटनिवडणुक नुकतीच पार पडली त्या निवडणुकी मध्ये चार उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. नांद्रा येथील निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना गुलाबरावजी पाटील तसेच जळगाव पंचायत समिती सभापती जनार्दन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

नांद्रा येथील सरपंच वासुदेव सोनवणे, माजी सरपंच प्रल्हाद पाटील, रघुनाथ महाजन, अशोक सोनवणे, मुकुंदा सोनवणे, नवल पाटील, जगदीश पाटील, रामचंद्र पाटील, आदिंनी परिश्रम घेतले. बिनविरोध निवड झाल्या बद्दल गावकर्‍यांनी सौ मनिषा पाटील यांचे अभिनंदन केले.

Spread the love