रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीचा समतोल साधणे गरजेचे निंभोरा येथील कृषी मेळाव्यात मधुकर पाचरणे यांचे प्रतिपादन

0
49

रावेर – तालुक्यातील निंभोरा येथील कृषी तंत्र विदयालयात दि.२२रोजी शेतकरी मेळावा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आरसीएफचे महाराष्ट्राचे उप प्रबंधक मधुकर पाचरणे यांनी आपल्या मनोगतात रासायनिक शेती इतकेच सेंद्रिय पदार्थांचे महत्व असून या दोघांचा समतोल साधल्यास शेतकरी बांधवांना योग्य खर्चात चांगले उत्पादन मिळेल असे प्रतिपादन मेळाव्यात व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माफदा,पुणे चे राज्याध्यक्ष विनोद तराळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर पाचरणे, वरिष्ठ शास्त्रज्ञ हेमंत गुरसाळे, कृषी विज्ञान केंद्र,पालचे शास्त्रज्ञ डॉ धीरज नेहेते,पी व्ही अणावकर,तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण पाटील,चेतन पाटील,गणेश खाडे, कन्हैया सोमाणी,चंद्रकांत अग्रवाल,सुनील कुलकर्णी,कृषी विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद बोंडे,निंभोरा माजी सरपंच डिगंबर चौधरी,रावेर तालुका ऍग्रो डीलर्स असो.चे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे आदी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना विनोद तराळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जिल्ह्यात रासायनिक खतांच्या पुरवठ्यात आरसीएफ चा वाटा सर्वात जास्त असून त्यामुळे जिल्ह्यात खतांची उपलब्धता चांगली होते मात्र रावेर तालुक्यात अनेकदा जळगावहुन अंतर जास्त असल्याने रासायनिक खते मिळत नाहीत अशावेळी सावदा येथील धक्क्यावर रासायनिक खतांचा पहिला रॅक आरसीएफ चा यावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे तसेच या भागातील केळीसाठी कंपोस्ट खतांचा एखादा डेपोब्या केळीपट्ट्यात करावा अशी मागणी यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडे केली त्यास संबंधित अधिकाऱ्यांनी दुजोरा देऊन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी हेमंत गुरसाळे व डॉ धीरज नेहेते यांनी जिवाणू खते, सेंद्रिय खतांची कार्ये,सूक्ष्म अन्नद्रव्ये,माती परीक्षण आदींची सविस्तर माहिती दिली.सूत्रसंचालन गणेश खाडे यांनी,प्रास्ताविक चेतन पाटील तर आभार प्रदर्शन सुनील कोंडे यांनी केले.

केळी पट्ट्यातील सर्वच कार्यक्रमात यापुढे केळीच्या पदार्थांचा वापर करावा जेणेकरून केळीच्या पदार्थांचे महत्व वाढून त्यातून रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होईल.

Spread the love