पैसे बचतीचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे बँक खाते. आपण आपली कमाई बँकेत जमा करतो. पण, जर खातेदाराचा अचानक मृत्यू झाला तर ती रक्कम नेमकी कुणाला मिळते, त्यासाठी काय प्रक्रिया पार पाडावी लागते, याची माहिती असणं गरजेचं असतं.
जर एखाद्या खातेदाराच मृत्यू झाला तर त्याची रक्कम कुणाला द्यावी, याचे नियम असतात. ज्यावेळी तुम्ही बँकेत खातं काढता तेव्हा तुम्हाला तुमचा नॉमिनी म्हणजे वारस देणं गरजेचं असतं. वारस म्हणजे तुमच्या पश्चात ज्याला ती रक्कम मिळायला हवी अशी व्यक्ती. तिचे तपशीलही तुम्हाला बँकेत सादर करावे लागतात. अशा प्रकरणात रक्कम थेट वारसदाराला मिळते.
अशा रकमेवर हक्क सांगताना वारसदाराला खातेदाराचं मृत्युपत्र बँकेत सादर करावं लागतं. ते नसेल तर वारसदार प्रमाणपत्र (Succession Certificate) संबंधिताच्या कुटुंबाने देणं गरजेचं असतं. हा दस्तऐवज अतिशय महत्त्वाचा असतो, त्यामुळेच मृत खातेदाराच्या वारसदाराची ओळख पटवली जाते. ही एक दीर्घ कायदेशीर प्रक्रिया आहे. जर खातेधारकाचं जोडखातं असेल, तर एकाच्या मृत्युनंतर दुसऱ्याला ती रक्कम मिळते. अर्थात अशा खातेदारांनीही आपला वारस देणं बंधनकारक असतं.
जर एखाद्या खातेदाराने स्वखुशीने आपल्या मृत्युपत्रात संबंधित रक्कम वेगळ्या व्यक्तिला द्यावी, अशी तरतूद केली असेल तर कायदेशीर वारसदारांना ती रक्कम मिळत नाही











