माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची आग्रही मागणी.
चोपडा – गोरगावले बुद्रूक गावातून जळगावकडे जाण्यासाठी नवीन राज्यमार्ग बनविण्यात आला आहे.चोपडा येथून धरणगाव व कोळन्हावी मार्गे ये-जा करणारी वाहतुक शॉर्टकटमुळे गोरगावले मार्गे वाढली आहे.हा राज्यमार्ग गाेरगांवले मधुन जात असल्याने येथील अरूंद गल्ली रस्त्यात वाहनांची कोंडी होऊन ट्रॅफिक जाम होत असते.रहिवाश्यांना आपापल्या घरांसमोर लग्नासह इतर कार्यक्रम करणेही मुश्किल झाले आहे.ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी,शेतकरी,शेतमजूर यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.येथे दिवसागणिक किरकोळ अपघात होत असल्याने वाहनधारक चालक व रहिवासी यांच्यात कायमच वादविवाद,भांडणतंटे,संघर्ष होत असतात.यामुळे ग्रामस्थांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.यासाठी गावाच्या बाहेरून जाणारा बायपास रस्ता मंजुर करावा,अशी आग्रही मागणी गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.
याबाबतचे निवेदन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटिल, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी, सा.बां.चे मुख्यअभियंता, चोपड्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, शाखाअभियंता, शहर पो.स्टे.चे पोलीस अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आलेले आहेत.
……………………………….
*शासन प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी..* खेडीभोकरी ते भोकर दरम्यान तापी नदीवरील हंगामी लाकडी पूल झाल्यापासून व नविन पक्का पुल झाल्यानंतरही गोरगांवलेकरांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.याबाबत संबंधित विभागाकडे ग्रा.पं.चे ठराव व निवेदने याआधीही दिलेली अाहेत.शासन प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन गोरगावलेच्या बाहेरून जाणारा बायपास रस्ता त्वरित मंजुर करावा.अशी अपेक्षा आहे.
जगन्नाथ बाविस्कर माजी संचालक..मार्केट कमेटी,चोपडा.












