चोपडा – तालुक्यातील गोरगांवले बु.मार्गे जळगांव पर्यंतचा रस्ता सुप्पर झाल्याने ह्या मार्गावरील वाहतुक वाढत आहे.वाहनधारक चालक वेगवान पध्दतीने वाहन चालवित आहेत.रस्त्याला जागोजागी लहानमोठे वळण घोल आहेत.पुढिल रस्ता लक्षात न आल्यामुळे वळणावर तसेच समोरासमोर वाहनांचे अपघात होत आहेत.याआधी बरेच अपघात होऊन त्यापैकी निम्मे लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.खासकरून गोरगांवले रस्त्यावरील हतनुर पाटबंधारे विभागाच्या लहान व मोठा कालव्यावरील पुलांची रूंदी नविन रस्त्यापेक्षा कमी असल्याने येथेच दिवसागणिक अपघात होतांना दिसत आहेत.ह्या पुलांची रूंदी वाढविण्यात यावी याबाबत पाठपुरावा सुरूच अाहे.परंतु अजुनही याकडे संबंधित विभागाचे अक्षम्यं दुर्लक्ष होत आहे.याआधीही ह्या अरूंद पुलांनी अनेकांचे बळी घेतलेले आहेत.यापुढे अशा घटना घडल्यास संबंधित विभागावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा,अशी संतप्त भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
घर कब आवोगे..परिवार आपली वाट बघत असतो.
चोपडा व्हाया गोरगांवले भोकर कानळदा मार्गे जळगांव पर्यंतच्या जिल्हा व राज्यमार्गावर वापरतांना सर्वच लहानमोठे वाहनधारक चालक यांनी वेगावर नियंत्रण ठेवुनच वाहन चालवावे.कारण “घर कब आवोगे” म्हणुन परिवार आपली वाट बघत असतो.तसेच पादचारी शेतकरी शेतमजुर गुराखी बैलगाडीधारक यांनीही आपल्या जीवीताचे रक्षण करावे.म्हणुनच ह्या रस्त्यावरून वापरतांना सावधानता बाळगावी..
जगन्नाथ बाविस्कर
(माजी सरपंच..गोरगांवले बु.,ता.चोपडा)











