शेतीमालाला हमी भाव मिळत नसल्याने मालाची रस्त्यावर हात विक्री !

0
49

जितेंद्र काटे

सुनसगाव -ता भुसावळ वार्ताहर – शेतकरी पिकवतो म्हणून शेतकऱ्यांना अन्नदाता म्हटले जाते.मात्र शेतात काबाडकष्ट करून शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी करावे तरी काय ? हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री आपणच करायची असा निर्णय घेतल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे .

आता सध्या टरबुजाचे सिझन आहे त्यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठमोठे टरबुजांचे दुकाने लागली आहेत विशेष म्हणजे ज्या माणसांना टरबुज झाडाला येते की वेलीला हे ही माहित नाही असे लोक शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन परस्पर विक्री करुन हजारों रुपये कमावतात . मात्र आता अशा गोष्टींना आडा बसेल असे चित्र दिसत आहे.आता शेतकरी राजा स्वतः व्यापारी होऊन आपला माल स्वतः विक्री करीत आहे आणि विशेष म्हणजे ग्राहकांनी सुध्दा थेट शेतकऱ्यांकडून माल घेणे पसंत केले आहे.त्यामुळे आता ठिकठिकाणी रस्त्यावर आपल्याला भाजीपाला ,फळे , धान्य तसेच टरबुज यांची विक्री करणारे शेतकरी दिसत आहेत तर काही शेतकरी ट्रॅक्टर किंवा बैलगाडी ने आपला शेतीमाल गावोगावी खेडोपाडी विक्रीसाठी नेत आहेत.यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या हातात चलन फिरताना दिसत आहे.

Spread the love