उन्हाची तीव्रता जाणवू लागल्या असून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागावी यासाठी विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 131 वी जयंती व जैन धर्माचे तीर्थंकर,धर्मसंस्थापक भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा तर्फे स्वर्गीय भारत खुशाल सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तळोदा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भारत माता व भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी कृषीधन चे मालक श्री.शांताराम अण्णा पाटील, जैन समाजाचे ट्रस्टी, विश्व हिंदू परिषद शहर अध्यक्ष श्री.मुकेश जैन, गजानन ॲग्रो चे मालक श्री.सुभाष चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री श्री.विजयराव सोनवणे, महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री.अंबालाल साठे,श्री.उमेश जैन,श्री.गौतम जैन,श्री.हर्षल जैन,श्री.प्रतीक जैन हे होते. याप्रसंगी सेवाभावे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री.उमेश भैय्या सोनवणे म्हणाले की, जल ही जीवन आहे ग्रामीण भागातील बंधू माता बहिणीसाठी फिल्टर चे थंड पाण्याची व्यवस्था करणे हेच आमचे कर्तव्य आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सेवाभावे प्रतिष्ठानाचे अध्यक्ष श्री.उमेश भैय्या सोनवणे, उपाध्यक्ष श्री.सागर पाटील, संचालक श्री.संतोष चौधरी, श्री.नकुल ठाकरे, श्री.अतुल पाटील, श्री.अनिल नाईक, श्री.आशिष मराठे, श्री.रोहन गुरव, श्री.विवेक चौधरी इत्यादींनी नियोजन केले.












