प्रतिनिधी – राजेंद्र महाले
रावेर – तालुक्यातील निंभोरा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण जागरूकता कार्यक्रमातंर्गत नवतंत्रज्ञानाची माहिती, माती व पाणी परीक्षण आदींबाबत माहिती देतील. कृष्णा घोलप,गुर्रम गोपीचंद ,सारंग हराळे, हर्षल जाधव
जयेश जाधव,दुर्गेश जैस्वाल हे कृषिदूत निंभोरा या गावात राहून पुढील १० आठवडे पदवीत आत्मसात केलेल्या कृषीविषयक ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी त्यांनी सरपंच सचिन महाले व ग्रामपंचायत कार्यालयातील सदस्यांची भेट घेतली.










