झुरखेडा गावातील दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रशासनचं मात्र दुर्लक्ष 

0
46

धरणगाव :-  तालुक्यातील झुरखेडा गावाचा परिसर क्षेत्रफळाच्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने खुप मोठा आहे. त्यातल्या त्यात ग्राम-प्रशासनाच्या वार्ड क्रं. ३ मध्ये राहणाऱ्या मध्ये दलित वस्ती व दुसखेडा गावात राहणाऱ्या आदिवासी नागरिकांचा समावेश आहे परंतु तेथील कामाकडे  सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. असे सुरेशआप्पा पवार (पाटील) सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, दलितवस्ती व दुसखेडा गावातील आदिवासी वस्तीच्या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांच्या जिवांशी आजही खेळ चालूच आहे. कारण यात ग्रामपंचायतीने गटारी साफ करणे. अथवा नवीन न बांधणे, रस्ता, लाईट, नादुरुस्त पाण्याची टाकी असल्यामुळे तिथे पाण्याच्या पाण्याची कोणतेही सोय नाही तसेच वारंवार तक्रार करून देखील नागरिकांच्या तक्रारीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असते तसेच लहान मुलांच्या शिक्षणासाठी दलित वस्तीत व दुसखेडा गावात अंगणवाडी आहे खरी पण त्याठिकाणी लाईट, पाणी, पंखा आजूबाजू घाण सफाई न करणे अश्या कोणत्याही सुविधा नसून मुलांच्या आरोग्याशी नुस्ता खेळ चालू आहे. ग्रामपंचायत कडून स्वच्छता कर्मचारी, कचऱ्याची, गटारीची सांडपाण्याची विल्हेवाट न लावणे हे ग्रामप्रशासनकडून केले जात नसुन त्याठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये सर्पांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगजंतु , प्लास्टिक , कचरा यांच्या वाढीमुळे दुर्गंधी पसरत आहे. व डासांच्या प्रमाणातही वाढ झाली असुन साथीचे , श्वसनाचे, मलेरिया अश्याप्रकारची रोगराईमुळे आजार वाढण्याची दाट शक्यता नाकारता येऊ शकत नाही

या परिसराला लागुनच अंगणवाडी आहे. 

या सर्व प्रकाराकडे लोकप्रतिनिधी , सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव, उपमुख्य कार्यकारी(ग्रामपंचायत), मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव या सर्व अधिकारी/ कर्मचारी लोकांचे गावातील नागरिकांच्या तक्रारी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना आता न्याय कोणाकडे मागावा हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

अश्या ग्रामप्रशासन व प्रशासनाचा नागरिकांना फायदा तरी काय?  

या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट न लावणे, तणनाशक फवारणी न करणे , डबके / खड्डे न बुजणे. नवीन रस्ता/गटारी न करणे, पिण्याच्या पाण्याची सोय न करणे, लहान मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या अंगणवाडीत कोणतेही सुविधा न पुरवीणे अश्या सर्व समस्यांकडे ग्रामप्रशासन व प्रशासन यांनी दलित व आदिवासी नागरिकांच्या आरोग्याशी चालू असलेला खेळ त्वरित बंद करून नियोजित सर्व कामे त्वरित करावी. अशी मागणी दलीतवस्ती व दुसखेडा गावातील आदिवासी राहणाऱ्या नागरिकांकडून  केली जात आहे.

Spread the love