ममुराबाद येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार; शेतकर्‍यांनमध्ये भितीचे वातावरण.

0
176

जळगाव-:तालुक्यातील ममुराबाद गावात बिबट्याने धुमाकूळ घालत शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सोमवारी पहाटे शेतकरी अमृत शेनपडु पाटील (गट नं.203) यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून त्याचा गोठ्यातच फडशा पाडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ममुराबाद शिवारातील विदगाव रस्त्यावरील गोठांनबल्ली मध्ये असलेल्या त्यांच्या शेतात अमृत पाटील हे रोजप्रमाणे आपल्या गोठ्यात गाय व वासरू बांधून घरी निघुन आले. सोमवारी पहाटे च्या सुमारास बिबट्याने अचानक वासरावर हल्ला चढवून त्यास ठार केले. त्यानंतर त्याने वासरू गोठ्यातच फस्त करून शेजारच्या शेतातून पसार झाल्याची चर्चा आहे. सकाळी नेहमी प्रमाणे ते आपल्या शेतात गेल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. तोपर्यंत बिबट्या तेथे दिसुन आला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वनरक्षक यांनी घटनास्थळी पंचनामा केला. घटलेल्या प्रकारानंतर वनविभागाने लक्ष देण्याचे देखील नागरिकांनी सांगीतले.

       सध्या कापुस वेचणीला जोर.

ममुराबाद शिवारामध्ये यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणीला वेळ न मिळाल्याने सध्या कापसाच्या शेतामध्ये कापूस वेचणीसाठी महिला मोठ्या प्रमाणात शेतात जात असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे.

Spread the love