जळगाव :- जळगाव येथे दिनांक २ व ३ एप्रिल रोजी आयोजित ३रे बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी करण्या करीता जळगाव येथील काही साहित्तीक व कार्यकर्त्यांची बैठक पदमालय विश्रामगृह येथे घेण्यात आली असता संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा भरत शिरसाठ यांनी बौद्ध साहित्य समेलन नियोजन समितीच्या ( सामाजिक व राजकीय विभाग ) प्रदेशाध्यक्ष पदी महाराष्ट्र जनक्रांति मोर्चा चे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची निवड केली .
प्रा भरत शिरसाठ यांनी संमेलनाची विस्तृत माहिती दिली व संमेलन यशस्वी करण्या करीता शहर , तालुका कार्यकारिणी ची निवड केली , मुकुंद सपकाळे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची प्रदेश अध्यक्ष पदी निवड करतांना त्यांनी सांगितले की सपकाळे हे सामाजिक , राजकीय , साहित्तीक चळवळीत सक्रिय असून ते उत्तम संघटक आहेत , राज्यात विविध ठिकाणी होणाऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या यशस्वीते करीता त्यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल .
प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की संमेलन यशस्वीते करीता सर्वच स्तरात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित केले जावे , सर्वानि जबाबदारीने काम करावे , बौद्ध साहित्य संमेलन जळगाव शहरात प्रथमच होत असल्याने ते यशस्वी करणे आपले कर्तव्य आहे , संमेलनास अधिकाधिक जनता कशी येईल याचे नियोजन व्हावे .प्रा हरिश्चंद्र सोनवणे , प्रा सतीश मोरे , प्रा रामभाऊ सोनवणे , विनोद रन्धे , बाबूराव वाघ , मनोहर गाढे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले .
सूत्रसंचालन डॉ अशोक सैंदाने , प्रास्ताविक प्रितलाल पवार , आभार मिलिंद सोनवणे यांनी केले , सभेस युवराज वाघ , समाधान सोनवणे , विवेक सैंदाने , रमेश सोनवणे , सुनील मोरे , राहुल भालेराव , भारत सोनवणे , महेन्द्र केदारे आदि कार्यकर्ते सभेस हजर होते .सभेच्या अखेरिस मुकुंद सपकाळे यांचा प्रा भरत शिरसाठ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला सपकाळे यांनी संमेलन यशस्वीते करीता तन मन धनाने सहकार्य केले जाईल असे सांगितले .











