Aadhaar Card Update आधार कार्डसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय

0
49

आधार कार्ड ही सध्या काळाची गरज झाली असून अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणूनही याचा वापर केला जातो. बँक खात्यापासून ते गॅस सिलिंडरपर्यंत आधार कार्ड आवश्यक झाले आहे. आधार कार्डचे महत्त्व लक्षात घेता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 10 वर्ष जुने आधार कार्ड अपडेट करण्याची मोहीम केंद्राने हाती घेतली आहे. यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ट्विट करून माहिती दिली आहे.

तुम्ही आधार कार्ड काढून 10 वर्षांचा कालावधी लोटला असेल तर ते अद्ययावत अर्थात अपडेट करण्याचे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांना आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, फोटो आणि बायोमॅट्रोक डाटा अद्ययावत करावा लागणार आहे. यासाठी आधार कार्ड धारक myAadhaar पोर्टलचाही वापर करू शकतो किंवा जवळच्या आधार कार्ड केंद्रामध्ये जाऊनही आधार कार्ड अपडेट करू शकतो.

दरम्यान, आधार कार्ड सतत अपडेट ठेवणे हे केवायसीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच अनेक योजनांसाठी अद्ययावत आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डमधील माहिती एकदम योग्य असणेही आवश्यक आहे.

ऑनलाईन अपडेट कसे कराल?

– मित्रांनो, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले UIDAI च्या myaadhar पोर्टल myaadhaar.uidai.gov.in वर जावे लागेल. नंतर तुमचे आधार लॉग इन करण्यासाठी Login बटन वर क्लिक करायचे आहे.

– यानंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे व दिलेला कॅपचा टाकायचा आहे. त्यानंतर सेंड ओटीपी वर क्लीक करून ओटीपी दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे व लॉग इन करायचे आहे.

– आता नेक्स्ट पेज वर थोडे खाली स्क्रोल करून Documents Update असा ऑप्शन दिसेल. त्या वर क्लिक करायचे आहे व पुढच्या पेज वर परत Next बटन वर क्लिक करायचे आहे.

– आता तुम्हाला आधार कार्डला डॉक्युमेंट अपडेट कसे करायचे याची माहिती दिसेल, त्याखाली असलेल्या Next बटन वर क्लिक करायचे आहे.

– आता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वर असलेली तुमची वैयक्तिक माहिती दाखवली जाईल ती एकदा चेक करून घ्या आणि पुढे जेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तेव्हा त्या डॉक्युमेंट वरची माहिती आणि ही आधार कार्ड वरील माहिती सारखी आहे का ते चेक करून घ्या. सारखी नसेल तर जवळच्या Aadhar E Seva Kendra ला भेट देऊन माहिती उपडेट करा. (उदा. नावात बदल, पत्ता, जन्मतारीख इ.)

– माहिती बरोबर असेल तर खाली असलेल्या बॉक्स ( I verify that above details are correct ) वर टिक करा.

– आता थोडे खाली स्क्रोल करून तुम्हाला दोन प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत

Proof of Identity (POI) / ओळखीचा पुरावा

Proof of Address (POA) / पत्त्याचा पुरावा

– इथे डॉक्युमेंट अपडेट करताना काही गाईडलाइन्स देण्यात आल्या आहेत जसे की डॉक्युमेंट हे 2MB पर्यंत च असावे, तसेच फाइल ही JPEJ, PDF, PNG फॉरमॅट मधेच अपलोड करावी. इथे तुम्ही तुमचे पॅन कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स अपलोड करू शकता. तुमच्या आधार कार्डवर जे नाव, जी जन्म तारीख आहे त्याच नावाचे डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट करायचे आहे.

– Proof of Identity (POI) – बँक पासबुक, ड्रायविंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, किसान फोटो पासबुक, विवाह प्रमाणपत्र, अपंग आयडी कार्ड/अपंग आरोग्य सर्टिफिकेट

– Proof of Address (POA) – ड्रायविंग लायसन्स, पासपोर्ट, लाईट बिल, गॅस कनेक्शन बिल, किसान फोटो पासबुक, विवाह प्रमाणपत्र, शाळेचे आयडी कार्ड…

– आता डॉक्युमेंट अपलोड झाल्या नंतर खाली agree ऑप्शन वर क्लिक करून मग Next बटन वर क्लिक करायचे आहे.

 

Spread the love