बाबा रामदेव यांचें ‘क्षमासन’; महिलांसंदर्भातील वादग्रस्त विधानासाठी मागितली माफी

0
44

ठाण्यात आयोजित योग कार्यक्रमात ‘महिला साड्या नेसून सुंदर दिसतात, ड्रेसमध्येसुद्धा चांगल्या दिसतात पण महिलांनी कपडे घातले नाही तरी त्या जास्त सुंदर दिसतात’, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे रामदेवबाबा यांच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या विधानाप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने रामदेवबाबा यांना नोटीस धाडली होती. या नोटिसीला लिखित उत्तर देताना रामदेव बाबा यांनी माफी मागितली आहे.

आयोगाला दिलेल्या या उत्तरात रामादेवबाबा म्हणतात की, ‘महाराष्ट्र महिला अधिनियम 1993 च्या अंतर्गत कथित रुपात कोणताही अपराध केलेला नाही. महिलांना समान दर्जा प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने महिला सशक्तीकरणाच्या दिशेन मी नेहमी काम केले आहे. सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमासाठी संघटनेसह काम केलं आहे.’

पुढे ते म्हणतात की, महिलांचा अपमान करण्याचा कोणताही माझा हेतू नव्हता. महिला सशक्तीकरणाच्या संदर्भात मी ठाण्यातील कार्यक्रमात उपस्थित होतो. मात्र त्यावेळी केलेल्या विधानाची काही सेकंदांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून चुकीचा अर्थ लावण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.

‘महिलांच्या वस्त्रांच्या संदर्भात मी बोलललललो त्याचे तात्पर्य साध्या वस्त्रांसंदर्भात (पेहराव) होता. तरी याविधानामुळे कुणाचा अपमान झाला असेल तर माफी मागते. मी खेद व्यक्त करत आहे’, अशा शब्दात त्यांनी लिखित स्वरुपात माफी मागितली.

Spread the love