मोस्ट अवेटेड चित्रपट पठाण स्टारर शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषय ठरला आहे. बेशरम रंग गाण्यचा वाद काही थांबण्याचे नावच घेत नाही.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती हिने नुकतंच सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर केलं असून बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्यामधील भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन निर्माण झालेल्या वादावर मत व्यक्त केले आहे. तिने ट्वीट शेअर करत लिहिले की, “रंग कधी बेशरम नसतात, लोकांचे विचार बेशरम असतात.”
Hello World ❤ pic.twitter.com/I1t9wc8rDY
— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) December 10, 2022
बेशरम रंग हे गाणं (दि, 12 डिसेंबर) रोजी प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. अनेक राजकारणी नेत्यांनी गाण्याला बॅन करण्यची मागणी केली आहे. मात्र, अभिनय क्षेत्रामधील अनेक कलाकारांनी या गाण्याला सर्थन केलेले दिसून येत आहे. नुकतंच कन्नड अभिनेत्री आणि पूर्व सांसद राम्या कृष्णन हिने देखिल दीपिका पादुकोण पाठिंबा दिला होता. त्याशिवाय ऋतिक रोशन याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिने देखिल चित्रपट 2 वेळेस पाहाण्याचा निर्णय घेतला आहे.
Rang kabhi besharam nahin ho sakte. Besharam hote hai logon ke iraade.
🙄🙄🙄— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) December 18, 2022
सांगायचे झाले तर पठाण चित्रपट (दि, 25 जानेवरी) रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहाण्यासठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली आहे. दीपिका आणि शाहरुखशिवाय या पठाण चित्रपटामध्ये जॉन अब्राहम देखिल पाहायला मिळणार आहे.











