मुंबई – राज्यात हवामानात अचानक बदल होत असल्याचे दिसून येत आहे.दिवसभर कडक उन्हाचा झळा तर रात्री थंडीचा कडाका पहायला मिळत आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आज (दि.05) ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी अचानक धुके पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. धुके पडल्याने आज दिवसभर ढगाळ वातावरणाबरोबर उन्हाच्या झळा बसण्याची शक्यात आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असला, तरी राज्याच्या कमाल तापमानात घट होत असल्याने दिसून येत आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातही धुक्याची चादर अनुभवायला येत आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. तर अमरावती जिल्ह्यातील तिवसा भागात पावसाच्या सरी पडल्या.
5 Dec, ढगाळ आकाश …
Latest satellite obs at 9.30 am that indicates partly cloudy sky over N Madhya Mah, N Marathwada and Vidarbha.
Possibilities of light rains over these regions in coming 2 days as per the forecast by IMD. pic.twitter.com/mc5FRFO6jP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2023
उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाल्याने बुधवारी (ता. 04) राजस्थानमधील चुरू येथे पारा शून्य अंशांच्याही खाली घसरल्याने देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे 0.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. 05) राजस्थानच्या काही भागात थंडीची तीव्र लाट, तर पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, चंडीगड, दिल्लीत थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला. उत्तर भारतात थंड दिवसदेखील अनुभवायला मिळणार आहे. ईशान्येकडील राज्यात दाट धुक्याची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 30.8 (13.8), जळगाव 27.8 (10.5), धुळे 27 (7.6), कोल्हापूर 29.9 (17.5), महाबळेश्वर 27.5 (14.4), नाशिक 30.4 (13.2), निफाड 30.2 (10.6), सांगली 30.2 (19.8), सातारा 30.5 (17.4), सोलापूर 35 (20.3), सांताक्रूझ 39 (16.4), रत्नागिरी 31 (19.2), औरंगाबाद 29.8 (11.5), नांदेड 30.6 (19.0), उस्मानाबाद – (15.6), परभणी 31.3 (17.4).
अकोला 30.2 (17.4), अमरावती 28.8 (14.1), बुलडाणा 28.6 (13.2), ब्रह्मपुरी 28.6 (16.5), चंद्रपूर 28.06 (17.4), गडचिरोली 28.06 (15.4), गोंदिया 26.6 (17.2), नागपूर 26.6 (17.5), वर्धा 25.9 (16), यवतमाळ 29.5(16.5) तापमानाची नोंद झाली.











