राहूल गांधींच्या फोटोबरोबर छेडछाड; काँग्रेसने स्मृती इराणींना फटकारले

0
45

मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे आरती करताना राहुल गांधींचे उलटे चित्र पोस्ट करून त्याच्याबरोबर छेडछाड करून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहूल गंधींची खिल्ली उडवल्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार प्रहार हल्ला केला आहे.

खा. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत असून राहूल गांधींच्या फोटोबरोबर छेडछाड; काँग्रेसने स्मृती इराणींना फटकारलेत्यांचे अनेक फोटो व्यायरल होत आहे. सध्या मध्यप्रदेशातून ही यात्रा जात असून मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर मंदिरात काल राहूल गांधींनी आरती केली या आरतीचे फोटो काल माध्यमामध्ये व्हायरल झाले असून त्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर करताना केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी राहूल गांधी यांची खिल्ली उडवली. या फोटोत राहूल गांधी आरती करत असून त्यांनी पांघरलेल्या शालीवर ‘ओम’ हे धार्मिक चिन्ह उलटे दिसत आहे. हा फोटो त्यांनी उलटा करून शेअर करून त्याखाली ‘अब ठिक है !’ असे कॅप्शन लिहले आहे.

स्मृती इराणी यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी, “काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपला राहूल गांधी यांची भीती वाटत आहे. येत्या काही दिवसांत त्या राहुल गांधींच्या चपलावरही बोलतील” असे म्हटले आहे. तर युवक काँग्रेसचे नेते बी.व्ही. श्रीनिवास यांनी केंद्रीय मंत्री इराणी यांना ‘सिली सोल मिनिस्टर’ असे संबोधले आहे.

Spread the love