शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या जामीनाविरोधातील EDच्या याचिकेवर न्यायमूर्तींनी सुनावणी करण्यास नकार दिला आहे. यामुळे आता संजय राऊत यांना मोठी दिलासा मिळाला आहे. ED ला आता नव्या न्यायमूर्तींपुढे ही याचिका पुन्हा करावी लागणार आहे.
संजय राऊत यांच्या जामीनाला स्थगिती मिळवण्यासाठी धावाधाव करणाऱ्या ईडीला नव्या न्यायमूर्तींकडे याचिका करावी लागणार आहे. याआधी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी ईडीने आधीच्या अपिलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सोमवारपर्यंतचा वेळ मागितला. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी ईडीला खडे बोल सुनावले आणि संजय राऊत यांच्या वकिलांनी नोंदवलेल्या आक्षेपाची दखल घेतली. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायमूर्तींनी पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला घेणार असल्याचे निश्चित केले होते. मात्र आज न्यायमूर्तींनी सुनावणीस नकार दिल्याने ईडीची पंचाईत झाली आहे.











