भगवान राम हे सीतेसोबत बसून मद्य प्यायचे, कानडी लेखकाचे वादग्रस्त वक्तव्य

0
45

कर्नाटकमधील प्रसिद्ध लेखक व निवृत्त प्राध्यापक के. एस. भगवान यांनी भगवान श्री प्रभू रामचंद्राविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘भगवान राम हे दुपारच्या वेळी सीतेसोबत बसून त्यानंतर उरलेला पूर्ण दिवस ते मद्य प्यायचे” असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सध्या लोकांमध्ये रामराज्य निर्माण व्हावं यांची चर्चा सुरू आहे. पण जर तुम्ही वाल्मिकी रामायणामधील उत्तरकांड वाचलं तर लक्षात येईल की भगवान राम हे आदर्श नव्हते. त्यांनी 11 हजार वर्षं राज्य केलं नव्हतं. त्यांनी फक्त 11 वर्षं राज्य केलं होतं” असा दावा के.एस भगवान यांनी केला आहे.

तसेच यावेळी त्यांनी प्रभू श्री राम चंद्राबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं. ”भगवान राम हे दुपारच्या वेळी सीतेसोबत बसून त्यानंतर उरलेला पूर्ण दिवस ते मद्य प्यायचे. त्यांनी आपल्या पत्नीला जंगलात पाठवलं. तिचा जराही विचार केला नाही. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या शूद्र व्यक्तीचं मुंडकं धडावेगळं केलं होतं. त्यामुळे ते आदर्श कसे असू शकतात, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

 

 

Spread the love