पालक संपर्क मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास – गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे 

0
52

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – जिल्हा परिषद मराठी शाळेत सर्वत्र पालक संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे या माध्यमातून शिक्षकवर्ग व पालक यांच्या सहकार्याने शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत . त्यामुळे पालक संपर्क मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास साधला जातो असे प्रतिपादन येथील मेळाव्यात भुसावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले.

येथे नुकतेच जिल्हा परिषद शाळेत पालक संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री चौधरी साहेब व गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी भेट दिली . त्यावेळी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार जितेंद्र काटे हे होते.यावेळी बाला उपक्रम राबविणे गरजेचे आहे त्यामुळे शाळेच्या आवारातील भिंती बोलक्या दिसतील आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल असे ही गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.यावेळी जितेंद्र काटे यांनी मेळाव्यात मोलाचे मार्गदर्शन केले .या पालक संपर्क मेळाव्यात माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष , पदाधिकारी , सरपंच दिपक सावकारे , सदस्य चंचल पाटील , एस आर पाटील उपस्थित होते मुख्याध्यापिका वंदना पाटील तसेच अरुणा तायडे , लता गालफाडे ,सरला जावळे यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले होते.

Spread the love