पष्टाणे – गावातील माजी सरपंच मा. किशोर निकम यांनी कमी वयात आपल्या गावांसाठी मोठ्या प्रमाणात विकासाची काम करत आहेत
जसे की गावातील पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत जन सामान्य लोकांना घरकुल मिळवून देणे ,गावात स्वच्छता अभियान,इंदिरा गांधी,संजय गांधी योजने अंतर्गत निराधारांना आधार मिळवून देणे.गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अनेक साऱ्या सरकारी योजनेतून गावातील लोकांना कसा यांचा फायदा होईल असा विचार विनिमय असणे.तरुणांना योग्य ते मार्गदर्शन,गावात स्वच्छता अभियान, गावात वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवणे गावातील सगळ्या जनतेला सोबत घेऊन आपलं गाव हे सुजलाम सुफलाम व आदर्श गावाची संकल्पना असित्वात आणण. धरणगाव तालुक्यात पष्टाणे गावाची एक वेगळीच ओळख अस्तित्वात आणली या सर्व कामांची दखल घेत.ग्राम संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम पष्टाणे खु येथे समाजसेवक आनंद दादा मराठे युवा मंच व अजिंक्यक्रांती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने
श्री किशोर निकम यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजसेवेसाठी तन-मन-धनाने सदैव तत्पर असणारे, युवकांना प्रेरणा देणारे सगळ्यांना सोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करता येतो.. असं करून दाखवणारे गावातील,परिसरातील सर्व जनतेसाठी दवाखान्याचे काम असेल, ऍक्सिडेंट असेल,आरोग्य च्या बाबतीत रात्री अर्ध्या रात्री केव्हावी कुठलीही परवा न करता नेहमीच मदतीला धावून जाणारे.गरिब अशिक्षित लोंकाची तहसील -पंचायत मधील लागणारी कागदपत्रे काढून देणे.या धावपळीच्या जीवनात कधी कधी आपल्याला आपल्यासाठी वेळ नसतो आपलीच घरची कामे आपलीकडून वेळेवर होतं नाहीत.आपलीच माणसं आपल्याला वेळ आल्यावर वेळ देत नाही.किशोर दादा आपला वेळ समाजासाठी गावासाठी देतात.समाजासाठी अशी माणसं फार कमी लाभतात…
मा.श्री आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून किशोर दादा निकम यांनी आपल्या गावाच्या विकासाला चालना दिली.











