ऋषभ पंतची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात, शास्त्रीय संगीताचा अपमान केल्याचा हंसल मेहता यांचा आरोप

0
44

चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हंसल मेहता अनेकदा सोशल मीडियावर अनेक मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत व्यक्त करत असतात. अलीकडेच हंसल मेहता यांनी Dream 11 च्या नवीन जाहिरातीत काम केलेल्या क्रिकेटपटू ऋषभ पंत याला लक्ष्य केले आहे.

हंसल मेहता यांनी नुकतंच एक ट्विट केलं, जिथं त्यांनी ऋषभ पंत आणि त्यानं काम केलेल्या जाहिरातीविषयी संतप्त प्रतिक्रिया दिली. शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी घेत Dream 11 च्या जाहिरातीमधून या कलेचीच अवहेलना केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. हा सर्व प्रकार घृणास्पद आणि अपमानास्पद आहे. स्वत:ची खिल्ली उडवा पण, कला आणि समृद्ध परंपरांचा असा हस करु नका. ड्रीम 11 नं ही जाहिरात मागे घ्यावी अशी मी मागणी करतो’, असं ट्विट त्यांनी केलं. मेहता यांनी केलेल्या या ट्विटवरही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

जाहिरातीत नेमकं काय होतं?

https://twitter.com/mehtahansal/status/1601430102524727296?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1601430102524727296%7Ctwgr%5Eaf901050e9dcd51af69ca797d354402c13dfb219%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fappyet_base%2F

या जाहिरातीत ऋषभ पंत हा विचार करतो आहे की, तो क्रिकेटर झाला नसता तर तो काय आता काय असता. त्यानंतर ऋषभ पंत शास्त्रीय गायकाच्या रुपात दिसतो. मात्र, तो माइकसमोर विकेटकीपरची भूमिका घेतो आणि खराब गाण गायला सुरुवात करतो. बऱ्याच दिवसांपासून ही जाहिरात टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे. याआधी कौशिकी चक्रवर्ती यांनीही ऋषभवर टीका केली आहे.

Spread the love