भारतीय बौद्ध महासभा जळगाव तर्फे वराड गाव येथे संविधान दिनानिमित्ताने कार्यक्रम संपन्न

0
46

जळगाव: काल 26 नोव्हेंबर संविधान दिन निमित्ताने वराड बुद्रुक येथे भारतीय बौद्ध महासभा जळगाव तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम शाखेचे अध्यक्ष जाधव बाबा होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष बी. एस. पवार होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्ह्याचे संस्कार विभागाचे सचिव रवींद्र वानखेडे, जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव आनंद ढिवरे आणि विजय इंगळे (जळगाव पोलीस) आदी मान्यवर होते. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बी. एस. पवार प्रमुख वक्ते यांनी *भारतीय संविधान* यावर सविस्तर व्याख्यान दिले. रवींद्र वानखेडे, विजय इंगळे, ग्राम शाखेचे बनसोडे, कापडे, जाधव बाबा यांनीही मनोगते व्यक्त केलीत. कार्यक्रमाला वराड बुद्रुक, वराड खुर्द, तसेच पंचक्रोशीतील उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन सचिव आनंद ढिवरे यांनी केले.

Spread the love