जळगावच्या ‘दाऊद’ला अटक, नाशिक कारागृहात रवानगी

0
35

जळगाव – खून, दरोडा, जबरी लुट, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला यासह 27 गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-24) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर येथे वास्तव्यास असून आता त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशान्वये नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.

दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख याच्या विरोधात अमळनेर पोलीसांनी स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. गुन्हेगार शिवम मनोज देशमुख हा गुन्ह्यात कारागृहातून सुटून पुन्हा शहरात येऊन दहशत निर्माण करत होता. त्याला कायद्याचा कोणताही धाक राहिला नव्हाता. तो सोबत काही शस्त्रे ठेवून नागरीकांना घाबरविण्याचा प्रयत्न करत होता. या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी चौकशी पुर्ण करून 3 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे प्रस्ताव पाठविला.

त्यानुसार हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना पाठविला. गुन्हेगाराची गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून गुन्हेगार शिवम याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले. जळगाव स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पो.ना. दिपक माळी, रविंद्र पाटील, किशोर पाटील, सिध्दार्थ शिसोदे तसचे अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी गुन्हेगाराला अटक करून जिल्हाधिकारी याच्या आदेशान्वये त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Spread the love