राज्यपालांना हटवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

0
52

महाराष्ट्र विकास आघाडीने  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्यासह अनेक मुद्द्यावर राज्यातील भाजप सरकारवर दबाव टाकण्यासाठी रणनिती आखली आहे. यासंबंधीची बैठक नुकतीच मुंबईत झाली असून या बैठकीला महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या टिप्पणीवरून राज्यपालांना महाविकास आघाडीसह अनेक पक्षानी विरोध केला. खासदार उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांच्या वक्तव्याचा तसेच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

यांचा शिवाजी महारांजाबरोबर मुख्यमंत्री शिंदे  यांची तुलना केल्याने निषेध करून भाजपला घरचा आहेर दिला. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आणि मराठा संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटून केंद्राने राज्यपालांना परत बोलावण्याची मागणी या संघटनांनी केली आहे.

आज झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपला विविध मुद्द्यावर घेरून दबाव वाढवण्यासाठी रणनिती आखण्यात आली. यामध्ये राज्यपाल हटाव यासह, महाराष्ट्रातून शेजारील राज्यांमध्ये जाणाऱ्या औद्योगिक गुंतवणुकीसह विविध मुद्द्यांवरून सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बैठकित शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच समाजवादी पक्ष, शेतकरी आणि कामगार पक्ष यासारख्या लहान मित्र पक्षांच्या नेत्यांनी विरोधकांच्या बैठकीत भाग घेतला. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश होता.

Spread the love