…म्हणून त्याने पवारांना दिली जीवे मारण्याची धमकी

0
41

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांना देशी कट्टयाने ठार मारू अशी धमकी देण्यात आली होती. अज्ञाताने पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी फोन करुन ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत तपासाची चक्रे फिरवली आणि थेट बिहार गाठलं. धमकी देणाऱ्या आरोपीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याने पवारांना धमकी का दिली, याबाबत खुलासा केला आहे.

नारायण कुमार सोनी असे पवारांना धमकी देणाऱया आरोपीचे नाव आहे. त्याच्या पत्नीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. त्याची पोलिसात तक्रार देऊनही पोलीस पत्नीवर कारवाई करत नसल्याने त्याने थेट पवारांनाच धमकी दिल्याचे पोलिसांना सांगितले. तर, धमकी देणारा व्यक्ती माथेफिरू असून, यापूर्वीही याच व्यक्तीने पवारांना धमकी दिल्याचा दावा पवारांच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर सिल्व्हर ओकवरील पोलीस ऑपरेटरने गावदेवी पोलिसात यासंदर्भात तक्रार दिली होती. मुंबई पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. पोलिसांनी कॉल लोकेशन ट्रेस केल्यानंतर फोन बिहारमधून आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी बिहार गाठलं. बिहारमधून आरोपी सोनीला ताब्यात घेऊन पोलीस आज महाराष्ट्राच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Spread the love