भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागपूर येथील कार्यालयात नितीन गडकरी यांना 3 वेळा फोन करून धमकी देण्यात आली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने ही धमकी देण्यात आली असून 2 कोटी खंडणी मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील खामला परिसरातील कार्यालयामध्ये आज सकाळी धमकीचे फोन आले. सकाळी 11.30 वाजता पहिला फोन आला. त्यानंतर आणखी फोन करण्यात आले.











