आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की आपला ओटीपी किंवा पिन कोणालाही शेअर करू नये. बँक व्यव्हार करताना तर अजिबातच नाही. विशेष म्हणजे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करताा पासवर्ड किंवा पिन कोणालाही शेयर करू नये.
याशिवाय जर तुमच्या मोबाईल वर कोणत्याही प्रकारचा OTP किंवा लिंक येत असेल तर यावर चुकूनही क्लिक करू नये. असे केल्याने आपल्या बँक अकाउंटवरील पैसा उडवला जाऊ शकतो.पण आता सायबर क्राईमचा एक नवा प्रकार समोर आलाय. या चोरीमध्ये कोणत्याही ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा लिंक शिवाय तुमच्या बँक अकाउंटमधील पैसा खाली होऊ शकतो.
दक्षिण दिल्लीत घडला असाच प्रकार
दक्षिण दिल्ली मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आलाय. सुरक्षा सेवेत असणारे एक व्यक्ती सायबर फसवणूकीचे बळी पडले आणि तब्बल 50 लाख गमावून बसले. त्यांना सायंकाळी 7 वाजल्यापासून 8.45 वाजेपर्यंत त्यांच्या फोनवर त्यांना मिस्क कॉल येत होते.
सुरवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यानंतर कॉल उचलला मात्र समोरच्याकडून काहीही आवाज आला नाही. त्यानंतर काही वेळातच त्यांचे 50 लाख बँक अकाउंटमधून काढण्यात आले.
सिम स्वाइप प्रकरण
असं म्हणतात की बँकमधून पैसे काढण्यासाठी आता सायबर क्रिमिनल आता ‘सिम स्वाइप फ्रॉड’ चा वापर करताहेत. यासाठी तुमच्या अकाउंटपर्यंत पोहचण्यासाठी फोन नंबरचा वापर केला जातोय आणि सिम स्विच केली जातेय.
हे सायबर क्रिमिनल तुमच्या मोबाईलमध्ये सिम प्रोवायडरसोबत संपर्क करतात आणि त्या नंबर वरील सिम कार्ड अॅक्टिव करण्यास सांगतात. एकदा सिम अॅक्टिव झाली की स्कॅमर्सला व्यक्तीच्या फोन नंबरवर कंट्रोल मिळवता येतो त्यानंतर तो कॉल किंवा टेक्स्ट वरही कंट्रोर करू शकतो.
अशा सायबर क्राइमपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं?
1. सिमला नेहमी अपडेट करत रहा. KYC ही वारंवार करत रहा.
2. कोणत्याही अनोळखी कॉल किंवा मेसेजला उत्तर देऊ नका.
3.अनोळख्या लिंकवर क्लिक करू नका.
4.जर कुणी तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले तर त्वरीत आपल्या बँकशी संपर्क करा आणि बँक लॉक करा.
5.फ्रॉडची माहिती सायबर सेल द्या.











