राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा स्वीकारला, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

0
45

हिंदुस्थानच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान आता रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या नव्या राजपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी भगतसिंग कोश्यारी यांच्यासह लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचाही राजीनामा स्वीकारला आहे. याशिवाय राष्ट्रपतींनी 13 राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अपमानजनक विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती. यामुळे त्यांची या पदावरून गच्छंती होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.

Spread the love